
जळगाव ३० मे : शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-१ चा जाहीर समारोप कार्यक्रम शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता संपन्न झाला. सदर समारोप कार्यक्रम मुळजी जेठा (एम जे कॉलेज) महाविद्यालय एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर संपन्न झाला.
समारोप कार्यक्रमात एकवीस दिवसाच्या वर्गात प्रशिक्षणार्थी स्वयं सेवकांनी नियुद्ध, दंड प्रहार, सामूहिक समता, योग् प्रात्यक्षिक सादर केले. कार्यकमाची सुरुवात श्री संजय जी तलखेडकर यांच्या प्रास्ताविक ने झाली. या प्रसंगी मंचावर श्री. उज्ज्वल चौधरी ( जळगाव शहर संघ सचालक ) डॉ. श्री. निलेश पाटील ( जळगाव जिल्हा संघचालक ) प्रमुख पाहुणे श्री राजेश चौधरी, ( कार्यकारी संचालक संन शाईन ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड जळगाव श्री बाळासाहेब चौधरी ( पश्चिम क्षेत्र कायर्वाह :- महाराष्ट्र, गुजरात, गोवा ) उपस्थित होते. श्री राजेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
सदर वर्गासाठी 255 प्रशिक्षणार्थी हॆ डॉक्टर, वकील, शिक्षक प्राध्यापक, कामगार, महाविद्यालयीन तरुण इत्यादी होते त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 33 संघ शिक्षक, 75कार्यकर्ते होते संघ वर्ग हा सकाळी 4,30 ते रात्री 10 पर्यंत सतत सुरु होता यामध्ये बौद्धिक माहिती, शारीरिक प्रशिक्षण, गीत गायन, योग, शारीरिक प्रशिक्षण शिकविले जाते. प्रमुख अतिथी श्री राजेशजी यांनी सांगितले की संघ हा चरित्र निर्माणाचे काम करतो. स्वयंसेवक हॆ भारत मातेची साधना करतात. संघ एक फक्त संस्था नाही तर एक विचार आहे.
प्रमुख वक्ते श्री बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले की आज संघला 100 वर्ष पूर्ण झाले आहे. आज संघचे नाव सर्वाना माहिती झाले आहे. संघाची विशेष कार्यपद्धती आहे. आपण सर्व एकजुट नसल्यामुळे आपल्यावर 1500 वर्ष परकियांनी राज्य केले. त्यामुळे आपण एकजूट राहण्यासाठी डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. आज सर्व समाज एकजूट होत आहे. हा देश एक हिंदू राष्ट्र आहे. आज सर्वासामान्य व्यक्ती व नेता सुद्धा म्हणतो की गर्व से कहो हम हिंदू है.
आज बरेच ठिकाणी लव जिहाद, लँड जिहाद अशा अनेक प्रकारांनी आपल्यावर आक्रमण होत आहे. त्यापासून समाजाला सावध व सक्षम करण्याचे काम स्वयंसेवक करत आहे. संघाला समतायुक्त, शोषणमुक्त समरस हिंदू समाज घडवायचा आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या समारोपनंतर भोजन व्यवस्था करण्यात आली होती. साधारण ४००० नागरिक या समारंभसाठी उपस्थित होते. पोळ्या संकलन करण्यात आल्या होत्या. महिलांचा सक्रिय सहभाग राहिला.
या समारोप कार्यक्रमास शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहकुटुंब व सह परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



