निवडणूक आयोगानुसार, ईव्हीएम व्यवस्थेत बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट सारखे तीन घटक असतात.
ईव्हीएम म्हणजे काय?
ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (Electronic Voting Machine) च्या माध्यमातून मतदान प्रक्रिया राबवण्यात येते. ईव्हीएम मशीनवर असलेल्या उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबून मतदार आपले मत नोंदवतात. मतदाराने बटन दाबल्यानंतर त्यांचे मत या ईव्हीएम मशीनमधील चिपमध्ये नोंद केले जाते.
बॅलेटिंग युनिट
बॅलेटिंग युनिटवर उमेदवारांची नावे, निवडणूक चिन्ह आणि एक बटण असते. सामान्य नागरिक याच बटणाचा वापर करून मत देतात. या मशिनखेरीज अन्य कोणत्याही मशिनच्या संपर्कात सामान्य नागरिक येत नाहीत.
कंट्रोल युनिट
कंट्रोल युनिटवर काही बटन असतात. स्टार्ट किंवा बॅलेट नावाचे बटन दाबल्यानंतर मतदार आपले मत टाकू शकतो.प्रत्येक वेळी नवीन मतदार आला की, बॅलेट बटन निवडणूक कर्मचाऱ्यांकडून दाबले जाते. कंट्रोल युनिटवर 'स्टॉप' हे एकमेव बटन असते. निवडणूक प्रक्रिया संपल्यावर हे बटन दाबले जाते. हे बटन दाबल्यानंतर एकही मत नव्याने टाकता &nbsयेत नाही. कंट्रोल युनिटवर 'रिजल्ट' नावाचे बटन असून, ते मतमोजणीसाठी वापरले जाते. ते बटण दाबल्यावर एक एक करून उमेदवाराचे नाव आणि त्याला मिळालेली मते दिसतात.
व्हीव्हीपॅट मशीन काय आहे?
एका पक्षासाठी दाबलेल्या बटनामुळे भलत्याच पक्षाला मत गेले, असे आरोप झाल्यामुळे 'व्हीव्हीपॅट' जोडण्यात येत आहे.
व्हीव्हीपॅट मशीन ईव्हीएमच्या (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) बॅलेट युनिटशी (बीयू) जोडलेली असते. जेव्हा मतदार ईव्हीएमवर मतदान करतो, त्याची मतपत्रिका व्हीव्हीपॅटमध्ये जमा होते. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिलेले असते, त्या मतदाराचे निवडणूक चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसते. सात सेकंद झाल्यानंतर ही मतपत्रिका आपोआप व्हीव्हीपॅट मशीनमध्ये जमा होते.
त्यामध्ये मतांच्या पावत्या प्रिंट होऊन सुरक्षित राहतात. त्यामुळे मोजणी करताना जरी डिस्प्ले हॅक झाला किंवा आकड्यांमध्ये फेरफार झाली तरी, या छापील पावत्यांच्या आधारे पडताळणी करता येऊ शकते.
सुप्रीम कोर्टाने EVM वर निवडणूक आयोगाला विचारले पाच महत्त्वाचे प्रश्न :
मायक्रो कंट्रोलर हे उपकरण कंट्रोल युनिटमध्ये असते की व्हीव्हीपॅटमध्ये?
- नियंत्रण एकक (सीयू), बॅलेटिंग युनिट (बीयू) आणि व्हीव्हीपीएटी या तिन्ही यंत्रांमध्ये स्वतंत्र मायक्रो-कंट्रोलर्स आहेत. हे मायक्रो कंट्रोलर सुरक्षित अनधिकृत ऍक्सेस डिटेक्शन मॉड्यूलमध्ये ठेवलेले आहेत. ते ऍक्सेस केले जाऊ शकत नाही.
- प्रत्येक यंत्रात स्वतंत्र मायक्रो-कंट्रोलर असल्यामुळे, मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करणे कठीण होते. यामुळे मतदानाची निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित होते.
प्रोग्राम हा वन टाइम असतो का? प्रोग्राम लोड झाल्यानंतर हा प्रोग्राम कोणत्या युनिट मध्ये होतो. ".. व्हीव्हीपॅट की इव्हीएम मशीनमध्ये होतो?
- मतदान यंत्रातील सर्व मायक्रो-कंट्रोलर्स एकदाच प्रोग्राम केले जाऊ शकतात. हे मायक्रो-कंट्रोलर्स निर्माणाच्या वेळी प्रोग्राम केले जातात व तिन्ही युनिट मध्ये फिट केले जातात. ते इन्सर्ट केल्यानंतर जाळले जाते, त्यामुळे ते कधीही बदलता येत नाही. त्यामुळे नंतर त्यात बदल करणे अशक्य आहे.
इलेक्शन कमिशन कडे किती सिम्बॉल लोडिंग युनिट्स उपलब्ध आहेत?
- इलेक्शन कमिशन कडे एकूण सिंबल लोडींग युनिट हे 4500 आहेत. त्यापैकी Electronics Corporation of India Limited (ECIL) चे १४०० युनिट आहेत, तर Bharat Heavy Electricals Limited (BHEL) चे ३,४०० युनिट आहेत.
कंट्रोल युनिटसह VVPAT मशीन सीलबंद आहे का?
- मतदानानंतर तिन्ही मशीन (BU, CU आणि VVPAT) सील केले जातात.
इव्हीएम स्टोरेज ४५ दिवस स्टोरेज असतं, यात वाढ होऊ शकते का?
मतमोजणीनंतर, निवडणूक याचिका दाखल करण्याचा वैधानिक कालावधी ४५ दिवसांचा आहे. त्यामुळे सर्व यंत्रे ४५ दिवस जमा करून ठेवली जातात. 46 व्या दिवशी, मुख्य निवडणूक अधिकारी संबंधित उच्च न्यायालयाच्या निबंधकांना पत्र लिहितात की कोणत्याही मतदारसंघासाठी निवडणूक याचिका दाखल केली गेली आहे की नाही हे तपासण्यासाठी. निबंधकांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर, त्यांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जेथे निवडणूक याचिका दाखल केली नाही तेथे स्ट्राँग रूम उघडण्याची सूचना केली. कोणतीही निवडणूक याचिका दाखल केल्यास, "ते (ईव्हीएम) सीलबंद आणि लॉक केलेले राहते, त्याला कोणी हात लावत नाही"
या बद्दल अधिक माहिती साठी खालील दिलेल्या बातमी वर क्लिक करा
https://www.livelaw.in/top-stories/supreme-court-eci-says-micro-controllers-are-one-time-programmable-evm-vvpat-256020
'ईव्हीएम' हॅकिंगचे दावे कितपत खरे?
एका पक्षाला मत देण्यासाठी बटन दाबल्यावर ते दुसऱ्याच पक्षाला जात असल्याची तक्रार प्रत्येक मतदानात होतच असते. मात्र, त्यात तितकेसे तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने वेळोवेळी सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत घेतलेल्या चाचण्यांमध्ये सिद्ध केले आहे. तरीही, खालील 'उद्योग' केल्यानंतरच 'ईव्हीएम'च्या हॅकिंगचा चमत्कार होऊ शकतो अन्यथा नाहीच.
- 'ईव्हीएम' तयार करतानाच त्यात फेरफार करावी लागेल. म्हणजेच 'बेल' आणि 'ईसीआयएल'मधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे घडणे केवळ अशक्य आहे.
- 'ईव्हीएम' तयार करतानाच समजा प्रोग्रॅमिंगमध्ये फेरफार करून ठेवले की, उदाहरणार्थ एक क्रमांकाचे बटण दाबले तरी मत चौथ्या क्रमांकाच्या उमेदवारालाच जाईल. ही फेरफार करणे अगदी सहज शक्य आहे. मात्र, 'ईव्हीएम' जेव्हा तयार होतात; तेव्हा तेथील कोणालाही बॅलेटिंग युनिटवर कोणाची नावे, कोणत्या क्रमाने असतील, हे कुणालाही माहिती नसते. किंबहुना कोणते मशिन कोणत्या राज्यात, कोणत्या मतदारसंघात जातील याची त्यांनाही कल्पना नसते. 'बॅलेटिंग युनिट'वर उमेदवारांची नावे, चिन्ह आणि क्रम अगदी ऐनवेळी ठरवले जातात आणि त्यात बदल केला जातो. याला निवडणूक आयोगाने 'शफल' असे म्हटले आहे.
- त्यामुळे मशिन तयार करतानाही बटणाचा फेरफार शक्य असूनही त्याचा फारसा उपयोग होत नाही. जरी या सर्व गोष्टी जुळून आल्या, तरी 'व्हीव्हीपॅट'मधील प्रिंट झालेल्या पावत्यांमुळे पडताळणी करता येऊ शकते.
'ईव्हीएम' हॅक होऊ शकते का?
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मशीनच्या फ्लॅश मेमोरीत दुसरा प्रोग्राम फीड केला जाऊ शकत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, फ़्लॅश मेमरीत कोणताही प्रोगाम अपलोड केला जात नाही. केवळ निवडणूक चिन्ह अपलोड केली जातात. जे केवळ इमेजेस रुपात असतात.
परंतु, जगात अशी एकही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही, की जी परिपूर्ण आहे असे म्हणू शकतो. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला कोणत्या ना कोणत्या प्रकारे धोका पोहोचवला जाऊ शकतो. 'ईव्हीएम'बाबतही असेच म्हटले जाऊ शकते. कसे ते पाहूया...
'ईव्हीएम'ला कोणतीही कनेक्टिव्हिटी किंवा इंटरनेट जोडणी नसली, तरी ब्लूटूथसदृश कोणतेही बाहेरील उपकरण 'कंट्रोल युनिट'ला जोडल्यास मतमोजणीवेळी 'कंट्रोल युनिट'च्या स्क्रिनवर हॅकरला हवे त्या प्रमाणे आकडे बदलले जाऊ शकतात. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया बरीच वेळखाऊ असल्याने ती पूर्ण होऊ दिली तरच हे शक्य आहे, असा हॅकरचा दावा आहे. 'कंट्रोल युनिट'च्या डिस्प्ले स्क्रीनखाली ब्लूटूथ उपकरण जोडूनही फेरफार केले जाऊ शकतात. डिस्प्ले स्क्रिन हा मुळातच लहान आणि नाजूक असल्यामुळे त्या खाली ब्लूटूथ उपकरण जोडताना पूर्ण डिस्प्ले स्क्रिन नवीन टाकला जातो.
'कंट्रोल युनिट'मध्ये फेरफार करून बाहेरील एखादे प्रोग्रॅम केलेले सर्किट किंवा मायक्रो कंट्रोलर चिप जोडता येऊ शकते. या चिपद्वारे 'कंट्रोल युनिट'ची आधीची मेमरी नष्ट करून नवीन मेमरी टाकता येते.
'कंट्रोल युनिट'ला बाहेरून एखादे उपकरण जोडणे आणि त्यातील मूळ माहिती (कोड) नष्ट करून नवीन व्हायरस असलेला कोड टाकता येऊ शकतो. त्यामुळे एकतर ते 'कंट्रोल युनिट' बंद पडेल किंवा कोड केल्याप्रमाणे मतमोजताना आकड्यांत फरक पडू शकतो.
देशातील 'ईव्हीएम' कसे सुरक्षित आहेत?
वरील दिलेले तिन्ही पर्याय अत्यंत योग्य असले, तरी या देशात मात्र शक्य नाहीत. ब्लूटूथ उपकरण किंवा अन्य कोणत्याही कोडिंगमध्ये फेरबदल केलेले उपकरण जोडण्यासाठी 'कंट्रोल युनिट'चा काही वेळ पूर्णपणे ताबा मिळणे गरजेचे आहे. आपल्या देशात संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये असणारी सुरक्षायंत्रणा भेदून जरी 'कंट्रोल युनिट'चा ताबा मिळवण्यात कुणी यशस्वी ठरलेच, तरी संबंधिताला एकाच 'कंट्रोल युनिट'चा ताबा मिळेल. एका मतदान केंद्रावर हजारो 'कंट्रोल युनिट' असतात. त्यामुळे एखादे 'कंट्रोल युनिट' जरी ताब्यात गेले तरी, अन्य ठिकाणचे मतदान फिरवणे सहज शक्य नाही. त्यामुळे सध्या विरोधी पक्षांकडून करण्यात येणारे दावे अत्यंत तकलादू आणि foul आहेत.
'कंट्रोल युनिट'च्या चिपवर असलेले कोडिंग नष्ट करून नवीन प्रोग्रॅमिंग करणे, हे जरी शक्य असले तरी, त्यासाठी 'कंट्रोल युनिट'चा ताबा मिळवणे आवश्यक आहे. तसेच, 'कंट्रोल युनिट'च्या पूर्ण सिस्टीमचे प्रोग्रॅमिंग 'ओटीपी' अर्थातच 'वन टाइम प्रोग्रॅमिंग' असते. त्यामुळे हा प्रोग्रॅम वाचता येऊ शकत नाही किंवा नवीन लिहिलाही जाऊ शकत नाही.
बाहेरील कोणतेही अन्य यंत्र 'ईव्हीएम' किंवा 'कंट्रोल युनिट'ला जोडले किंवा चिपमध्ये फेरफार केला, तरच 'कंट्रोल युनिट' काम करणे बंद करते. ही पाययोजना मूळ यंत्रणेतच करणे शक्य आहे.
एका पक्षासाठी दाबलेल्या बटनामुळे भलत्याच पक्षाला मत गेले, असे आरोप झाल्यामुळे 'व्हीव्हीपॅट' जोडण्यात येत आहे. त्यामध्ये मतांच्या पावत्या प्रिंट होऊन सुरक्षित राहतात. त्यामुळे मोजणी करताना जरी डिस्प्ले हॅक झाला किंवा आकड्यांमध्ये फेरफार झाली तरी, या छापील पावत्यांच्या आधारे पडताळणी करता येऊ शकेल.
'कंट्रोल युनिट'वर असलेले 'स्टॉप' बटन नीट दाबले गेले नाही, तर नंतर बोगस मतदान करता येऊ शकते. मात्र, ही यंत्रणा 'रिअल टाइम' असल्यामुळे मतदानाची तारीख आणि वेळेखेरीज इतर कोणत्याही वेळी झालेले मतदान मशिनकडून आपोआपच ग्राह्य धरले जात नाही. प्रत्येक मतासोबत त्याची तारीख आणि वेळही ‘save’ केली जाते.
सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा इव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. निवडणूक आयोगाने इव्हीएम मध्ये कसलीही छेडछाड करता येऊ शकत नाही असे अनेकदा सांगितले आहे. एवढेच काय तर त्यांनी इव्हीएम माशीनमध्ये छेडछाड करून दाखवा आणि बक्षीस मिळवा असे जाहीर केले आहे. परंतु, अद्याप कोणीही इव्हीएम माशीनमध्ये छेडछाड करू शकले नाही.
बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, हा हट्ट कशासाठी?
२०२३ मध्ये जेव्हा पश्चिम बंगाल मध्ये बॅलेट पेपरच्या द्वारे निवडणूक लढविण्यात आली, तेव्हा बरेच ठिकाणी मतपेट्या चोरल्या गेल्या होत्या. काही ठिकाणी मतपेट्यांनाआग लावल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या.
https://x.com/ANI/status/995949628850765824
https://timesofindia.indiatimes.com/india/over-16-dead-in-bengal-panchayat-polls-violence-ballot-boxes-set-on-fire-or-stolen-bengal-sec-says-will-look-into-demands-for-re-poll-key-developments/articleshow/101600628.cms
पाकिस्तान मध्ये जेव्हा बॅलेट पेपरच्या द्वारे निवडणूक लढविण्यात आली तेव्हा कसा मतांमध्ये फेर बदल करण्यात आला हे सर्व जगाने पाहिले. इम्रान खान यांच्या पक्षाच्या मतांमध्ये फेर बदल झालेला आढळला.
“Voting slips with the names of Cristiano Ronaldo, Messi, Neymar & Mbappe were also issued in Pakistan Election 2024. Media outlets around the world denounced the election as "fraudulent". “
ई.व्ही.एम ने घेण्यात येत असलेली मतदान प्रक्रिया अगदी योग्य आहे.
Venkatrao Vitthalrao Patil
07 Dec 2024 23:35
ईव्हीएम मशीन हे एकदम चांगली मशीन आहे त्यात कोणताही बदल होऊ शकत नाही हे सत्य आहे
RAMAKANT REDDY
27 Nov 2024 20:22