विशाळगड म्हटला कि पहिली आठवण येते ती बाजीप्रभू देशपांडे यांची. त्यांचे वीरमरण, त्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी वाहिलेली स्वामी निष्ठा, त्यांचा पराक्रम, प्रखर हिंदुत्व अश्या सर्वच गोष्टींमुळे शिवप्रेमी त्यांच्या समाधीसमोर अभिमानाने नतमस्तक होतात. पन्हाळगड ते विशाळगड अशी सत्तर किलोमीटरची यात्रा पावसाळ्यात पूर्ण करणे हे प्रत्येक मर्द मराठी तरुण-तरुणीचे स्वप्न असते. त्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक हा प्रवास करायला येत असतात. महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासापासून प्रेरणा घेत असतात. परंतु गेल्या तीस चाळीस वर्षात या गडावर एवढे अतिक्रमण झाले की यासीन भटकळ सारख्या दहशतवाद्याला सुद्धा इथे आश्रय देण्यात आला होता. विशाळगडवरील अतिक्रमण केवळ जमिनीचे अतिक्रमण नसून देशविरोधी गतीविधी सुद्धा इथे चालतात की काय असा प्रश्न निर्माण होतो.
कोण होता दहशतवादी यासीन भटकळ?
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत (German Bakery) 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 17 जणांचा मृत्यु झाला होता, तर 56 जण जखमी झाले होते़. या स्फोटातील मुख्य आरोपी यासीन भटकळ (Yasin Bhatkal) होता. याच्यावर पुण्यातील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले होते.
त्यानंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या खटल्यात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांच्या कोर्टाने 2012 साली भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या कटात यासिन भटकळ आणि मोहम्मद दानिश अन्सारी यांच्यासह एकूण 11 जणांचा सहभाग असल्याचे मान्य केले.
यासह भटकळने या गुन्हेगारी कटाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण तयारी आणि कृती आराखडा तयार केला होता. ही योजना राबवण्यासाठी केलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये भटकळ आणि दानिश यांचा सहभाग होता. एवढेच काय तर न्यायालयाने सांगितले की, पुराव्यांनुसार भटकळच्या गप्पांमधून सुरतमध्ये अणुस्फोटाचा कट उघड झाला.
जिहादच्या नावाखाली त्याने त्याच्याकडून जप्त केलेल्या डिजिटल सामग्रीमध्ये गैर-मुस्लिमांच्या हत्येचे समर्थन करणारे लेख आणि व्हिडिओ प्रसारित केले होते. मुस्लिमांना तिथून हुसकावून लावल्यानंतर या लोकांना बॉम्बस्फोट करून भारताविरुद्ध युद्ध सुरू करायचे होते.
भटकळने या प्रकरणात केवळ कट रचला नाही तर स्फोटासाठी आयईडी तयार करण्यातही मदत केली होती. इतक्या गंभीर स्वरूपाच्या दहशतवाद्याला विशाळगडावर आश्रय मिळाला म्हणजे तिथे कोणत्या विचाराचे लोक सध्या राहत आहे याचा अंदाज येतो.
कसे झाले विशाळगडावर अतिक्रमण?
गेल्या काही वर्षांत विशाळगडावर मोठ्या प्रमाणात जमीन जिहादचे तंत्र वापरून टपऱ्या, दुकाने, दर्गा, मशीद, घरे उभी करायला सुरुवात केली. ६००-७०० मुस्लिम घरे गेल्या चाळीस वर्षांत येथे उभी राहिली आहेत. हजार बाराशे मुस्लीम लोकवस्तीचे गावच विशालगडासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक गडकिल्यावर निर्माण झाले आहे.
गडावर महादेवाचे, गणपतीचे मंदिर आहे. पण ती मंदिरेही अतिशय दुर्लक्षित अवस्थेत टाकली गेली आहेत. या मंदिरांचे दगड, आणि बाकीचे बांधकाम साहित्य काढून, अक्षरशः पळवून नेले गेल्याने ती आता अगदीच मोडकळीला आणली गेली आहेत. इतकेच नव्हे तर स्थानिक लोकांनी चिकनची पन्नास आणि मटणाची ४ दुकानेही येथे लावली होती. हिंदूंच्या पवित्र, आणि ऐतिहासिक स्थानावर अशी पशुपक्ष्यांची हत्या करणारी दुकाने चालू नयेत या युक्तिवादानंतर निदान आता तरी कोर्टाच्या आदेशाने ती बंद झाली आहेत.
ज्या थडग्यापासून या अतिक्रमणांचा सुरुवात झाली तो गेली अनेक वर्षे केवळ एक चौथरा होता. मग तेथे ३०० स्क्वेअर फुटाचा एक दर्गा बनवला गेला. आज तोच तथाकथित दर्गा म्हणजे २००-२५० लोक सहज राहू शकतील अशी ३००० स्क्वेअर फुटांची पक्के बांधकाम केलेली मशीद आहे. त्यालाही पूर्वी सरकारी मदत दिली गेली आहे.
इतकेच नव्हे तर इथे जी पक्की घरे आहेत ती बांधण्यासाठी काँग्रेसच्या २००४ ते २०१४ या काळात प्रधानमंत्री आवास योजनेतून ५० हजार ते दोन लाखापर्यंत निधी दिला गेल्याची बाब समोर आली आहे.
अनेक क्रिमिनल केसेस असणारे जिहादी विचारांचे गुन्हेगार या भागात आश्रयास येत असतात असेही निदर्शनास आले आहे.
Mumbra चा डोंगर पण काबीज केला आहे iHAjxZ
तुकाराम चव्हाण
12 Jul 2024 20:20
14 जुलै 2024
विशाळगड मुक्ती शौर्य दीवस
तुकाराम खुटाळे
12 Jul 2024 17:57
विशाल गड लवकर जीहाद्यांच्या ताब्यातून मुक्त करा????????
Harshal salsundar
12 Jul 2024 16:04