“संवादात् सौहार्दम् ”
विश्व संवाद केंद्र, देवगिरी हे मध्य महाराष्ट्रातील एक नोंदणीकृत ( Reg. No. F-10993) माध्यम केंद्र आहे.
२००५ पासून आम्ही मराठवाडा- खान्देश भागात विविध माध्यम संवाद उपक्रमाद्वारे सक्रीय आहोत.
राष्ट्रीय विचारांच्या जागरणासाठी विविध बातम्या, माहिती यांचे संकलन, विषय प्रस्तुती, सत्यशोधन आणि माध्यम- संवाद हे विश्व संवाद केंद्राचे कार्यक्षेत्र आहे.
दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लेखक, स्तंभलेखक, पत्रकार व माध्यमकर्मींना ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराने’ केंद्राच्या वतीने सन्मानित करण्यात येते. यासह विविध परिसंवाद, समाजमाध्यमांतून संवाद, व्याख्याने, महत्त्वाच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण, माध्यमकर्मींचे स्नेहमिलन हे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमही केंद्रातर्फे राबवले जातात.
व्यापक संपर्कसूची असलेले विश्व संवाद केंद्र माध्यमे आणि लोक यांतील संपर्कसेतू म्हणून महत्त्वपूर्ण कार्य करते.
विश्व संवाद केंद्र, देवगिरी ही नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे.