भारतीय जनमानसात नेता आणि नेतृत्त्वाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. व्यक्तीकेंद्रीत झालेल्या समाजात महापुरूष किंवा समाज नेत्याच्या माध्यमातून खोटा नरेटिव्ह सहज पोहचविता येतो. संस्कृती, समाज आणि इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी महापुरूषांच्या इतिहासाचा शस्त्राप्रमाणे वापर करण्यात येत आहे. इतिहासात खोटे संदर्भ घुसडवणे हा तर नरेटीव्ह पसरविण्याचा राजमार्ग झाला आहे. मात्र, त्या आधारे एखादे पात्र उभे करणे, त्याचा इतिहास रचणे, सोबतीला संदर्भ ग्रंथ, गुगलचे डुडल तयार करत एक चळवळ उभी करणे म्हणजे खोट्या नरेटिव्हचा मास्टरपीसच म्हणावा लागेल.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पत्रातील एका ओळीचा आधार घेत ‘फातिमा शेख’ या कथित पहिल्या मुस्लिम शिक्षिकेचे चरित्रच उभे करण्यात आले आहे. ज्याला कुठलाही समकालीन ऐतिहासिक संदर्भ नाही. मात्र, त्यावर देशभरात चळवळ उभी करण्यात आली असून, समाजाचे संघटन करण्या ऐवजी समाजात फूट पाडण्याचे काम करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
'फातिमा शेख' नावाने एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक असल्याचे जनमानसात रूजविण्यात आले आहे. त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. तसेच त्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले, असेही सांगितले जाते. मात्र, याबद्दल कोणताही समकालिन पुरावा नाही. ९ जानेवारी २०२२ मध्ये गुगलने त्यांचे डूडल तयार केले. त्यानंतर फातिमा शेख यांच्या नावाने देशभरात कार्यक्रम आणि जलसे घेण्यात आली. फुले दांपत्याचे चरित्र अभ्यासक आणि सामाजिक चळवळींतील अग्रणी नेतृत्त्व दिवंगत हरी नरके यांनी फातिमा शेख यांच्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या अधिकृत एक्स हॅंडलवरून प्रश्न विचारत ते म्हणतात -
"फातिमा शेख यांना जयंती निमित्त अभिवादन करणारे डुडल आणि त्यानंतर फेबुवर अभिवादनाचा वर्षाव सुरुय. आनंद आहे. ही जन्मतारीख नेमकी कोणी शोधून काढली? कधी काढली? कशाच्या आधारे? कोणत्या दस्तऐवजात ही नोंद मिळाली हे मला समजून घ्यायला आवडेल..कृपया कुणी सांगू शकेल का? एक कळकळीची विनंती."
पुढे एका कमेंटला उत्तर देताना ते म्हणतात, "फातिमा यांचे लेखन सापडलेले नाही. त्यांचे फार त्रोटक उल्लेख मिळतात, त्याच्यावरून काही लोकांनी मनाने घडवलेल्या कहाण्या रचलेल्या आहेत." एका सुनियोजित पद्धतीने समाजात एखादे खोटे व्यक्तिचरित्र निर्माण केले जाते. त्या आधारावर एक संपूर्ण चळवळ एवढंच काय सरकारी धोरणही बदलले जाते. एक सार्वभौम आणि लोकशाही राष्ट्र म्हणून निश्चितच ही धोक्याची घंटा नाही का?
(प्रा. हरी नरके यांची ट्वीटर पोस्टची लिंक- https://x.com/harinarke/status/1480083002512211969 )
एका ओळीचा उल्लेख
१० ऑक्टोबर १८५६ रोजी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना लिहलेल्या पत्रामध्ये 'फातिमा' असा उल्लेख करतात. सावित्रीबाई यांनी स्वतःच्या तब्येतीविषयी ते पत्र लिहिले होते. पत्रात सावित्रीबाई फुले म्हणतात, "फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही." यावरून त्या मुस्लिम होत्या, आडनाव शेख होते, त्या शिक्षिका होत्या इतका इतिहास रचला गेला. गांभिर्याची बाब म्हणजे एवढी एक ओळ सोडता कोणताही समकालीन संदर्भ नाही. गंमत म्हणजे अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुलेंची भेट झाल्याचेही सांगितले जाते. फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत फातिमा शेख यांनी भाग घेतला. असा खोटा इतिहासही रचला गेला. ज्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
------------------
फातिमा शेख यांच्याबद्दल महत्त्वाचे प्रश्न ः
काही वर्षांपासुन ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांची सैन्यात मुस्लिम सैनिकांची संख्या मुद्दाम वाढवली जात आहे. त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचे योगदान कमी करण्यासाठी फातिमा शेख नावाचे प्रस्थ वाढवले जात आहे. दरवर्षी याबाबत वेगवेगळ्या कहाण्या प्रसृत केल्या जात आहे. फातिमा शेख नामक महिलेचा उल्लेख सावित्रीबाईंनी जोतीराव फुले यांना लिहिलेल्या पत्रात येतो, त्याशिवाय अन्य कुठलाही संदर्भ सापडत नाही.
सावित्रीबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्यात कोणी मदत केली असल्यास त्याचा आदरच आहे. पण त्याला पुरावे आणि संदर्भ असणे आवश्यक आहे. मुस्लीम समाजात महिलांना किती दुय्यम वागणूक दिली जाते हे जगजाहीर आहे. त्यामुळे अश्या समाजात सावित्रीमाई प्रमाणे एखादी प्रागतिक पुरोगामी विचारांच्या महिलेने समाज हितासाठी कार्य केले तर त्याचे कौतुकच होईल, परंतु बाजारगप्पांच्या आधारे कुणीही सावित्रीबाईंच्या कार्याला कमी करू इच्छित असेल तर ते कोणालाही आवडणार नाही.
फातिमा शेखबाबत पडलेले काही प्रश्न -
1) फातिमा शेख ही भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका असेल , तर त्यांचे शिक्षण कुठे झाले होते? मुस्लिम समाज आजही किताबपेक्षा हिजाबला प्राधान्य देतो मग त्याकाळी फातिमा शेख यांनी कुठे शिक्षण घेतले? तशी नोंद आहे का?
2) फातिमा शेख यांची जयंती अलीकडे 9 जानेवारीला साजरी केली जाते. ही तारिख कशाच्या आधारे शोधुन काढली? त्याला कोणता पुरावा आणि संदर्भ उपलब्ध आहे?
3) फातिमा शेख यांचा फोटो आजकाल सोशल मिडियावर शेअर केला जातो,तो पाकीस्तानातील एका महिलेचा आहे. एका पाकीस्तानी महिलेला 'फातिमा शेख' म्हणून भारतीयांच्या माथी का मारले जाते?
( हा फोटो फातिमा शेखचा नसुन पाकीस्तानातील महिलेचा आहे,हे मुस्लिम विचारवंत शमसुद्दीन तांबोळी यांनीही मान्य केले आहे. स्क्रीनशाॅट जोडला आहे)
4) फातिमा शेख या महात्मा फुलेंच्या शाळेत शिक्षिका होत्या,याची नोंद कुठे आहे? तसा संदर्भ उपलब्ध आहे का?
डाव्यांच्या इतिहास आणि कारनामे बघता फातिमा शेख हे प्रकरण भविष्यात हळूहळू एवढे मोठे केले जाईल की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे गुरु उस्मान शेख आणि फातिमा शेख होत्या, असे कोणी सांगू लागले तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण राहणार नाही.
------
खालील पोस्ट पण बघा . हे आणखी अवघड प्रकरण आहे.
https://www.facebook.com/share/14knP3197C/
सनातन
09 Jan 2025 11:57