अलीकडे महाराष्ट्रात एक नवीन फॅशन आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जास्तीत जास्त मुस्लिम कसे होते, हे सांगण्याची. याबाबत काही लोकांची स्पर्धाच लागली आहे. कोणी म्हणतो ३५ टक्के होते, कोणी ५७ टक्के सांगतो, काही जण तर ९० टक्के मुस्लिम असल्याचा दावा करतात. अशी ही आकडेवारी फुगवून सांगितली जाते. काही दिवसानंतर कदाचित शिवरायांच्या सैन्यात १०० मुस्लिमच होते, असाही हास्यास्पद दावा हे लोक करु शकतात. त्यांचा भरवसा नाही. शिवरायांनी रायगडावर मशिद बांधली, मशिदींना इनामे दिली, असाही खोटा दावा सातत्याने केला जातो.
पण सत्य काय आहे?
शिवाजीमहाराजांच्या पदरी किती मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती? तर शिवाजी महाराजांच्या पदरी १६५७ सालापर्यंत चार - पाच मुसलमान होते. १६५८ सालापासून शिवरायांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी आदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याची पहिली घटना १६५८ ची आहे. त्यापूर्वी शिवाजी महाराज त्यांच्या वडीलांचे म्हणजेच शहाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून जहागिरीचा कारभार पाहत होते. त्यावेळी जे आधिकारी होते, त्यात सिद्दी अंबर बगदादी हा पुण्याचा हवालदार होता. जैनाखान पिरजादे हा सरहवालदार होता. बेहेलिमखान हा बारामतीचा हवालदार होता. १६५८ साली शिवरायांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली व त्यानंतर शिवरायांचा एकही मुलकी अधिकारी मुसलमान राहिलेला नाही. म्हणजे शहाजी महाराज असेपर्यंतच शिवाजी महाराजांचा मुस्लीम सरदारांशी संबंध आला आहे. आता शिवरायांच्या सैन्यातील अपप्रचार व खोट्या माहितीने सांगितलेली नावे व त्यांची सत्यता पाहू.
नूरखान बेग हा पायदळाचा सेनापती होता. तो १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो, त्यानंतर येसाजी कंक हे पायदळाचे सेनापती आहेत, नूरखान बेग नव्हे!
एक होता सिद्दी हिलाल जो महाराजांकडे येऊन राहिला होता. पूर्वी तो आदिलशाहीत होता. तो होता खेळोजी राजांचा क्रीतपुत्र. म्हणजे विकत घेतलेला गुलाम. मग त्याला हिंदु का केले नाही? तर अडचण अशी होती की त्या काळी जन्माने जो हिंदु नाही, त्याला हिंदु करता येत नाही असा सर्वत्र समज होता.
शिवरायांच्या नौदलाचे दोन अधिकारी होते. दौलतखान आणि दर्यासारंग. त्या दर्यासारंगला महाराजांनीच १६७९ साली साली अटक केली होती. आता दौलतखान का होता? तर त्यावेळेला स्वराज्यात नौदलासाठी अनुभवी लोक नव्हते. शिवरायांनी प्रथमच मराठी सैन्याचे नौदल उभे केले होते. म्हणून हा दौलतखान होता. आपला भारतदेश १९४७ साली स्वतंत्र झाला, त्यानंतर दहा वर्ष भारतीय नौदल आणि हवाई दल यांचे प्रमुख ब्रिटीश होते. कारण आपल्याकडे त्या क्षेत्रातील अनुभवी लोक नव्हते म्हणून. त्याचप्रमाणे दौलतखान ठेवला होता. मात्र दौलतखानानंतर पुढे कायम आंग्रे आणि धुळप यांनी मराठी आरमाराचे नेतृत्व केले आहे.
अफजलखानाचा वध केला, त्यावेळी शिवरायांचे अंगरक्षक होते, त्यापैकी सिद्दी इब्राहीम हा एक होता. त्याचीही स्थिती सिद्दी हिलालसारखी होती. या व्यतिरिक्त शिवरायांच्या सैन्यात कोणीही मुसलमान नव्हता.
मदारी मेहतर हे नाव खोटे आहे. त्याला समकालीन कागदपत्राचा कोणताही आधार नाही. या काल्पनिक मदारी ला शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून दाखवले जाते, ते साफ चुकीचे आहे.
शिवरायांकडे एक फारसी कारकून होता, त्याचे नाव काझी हैदर. त्याने स्वराज्याशी द्रोह करून १६८२ साली तो औरंगजेबाला जाऊन मिळाला होता. शिवाजीमहाराजांनी व्यंकोजीराजांना जे पत्र लिहीलय, त्यात "मी तुर्कांना मारतो आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत, तर तुझा विजय कसा होईल? असे स्पष्ट लिहिले आहे. आजही तंजावरी मराठीत मुसलमानाना "तुरुक" म्हणतात.
छत्रपती शिवरायांनी महाराजांनी कुठल्याही मशिदीला नवीन इनामे करुन दिलेले नाही. जी पूर्वीची दोन, तीन मशिदींची इनाम चालू होती, तेवढीच काय ती होती. मात्र शिवाजीमहाराजांनी कोणत्याही मशिदीला नवीन इनाम करुन दिल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही शिवाजीमहाराजांनी रायगडावर मशिद बांधली असाही अपप्रचार केला जातो, पण शिवरायांनी कधीही, कुठेही मशिद बांधलेली नाही.
परंतु ज्याठिकाणी मंदिरे पाडून मशिदी उभारल्या होत्या, त्या मशिदी शिवरायांनी पाडल्याची उदाहरणे आहेत. एक डाॅ.फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. हा फ्रायर डाॅक्टर होता. तो कल्याण भिवंडीला आला होता. तो लिहितो की तिथे मशिदी होत्या त्या शिवाजीमहाराजांनी पाडल्या व त्याच्याऐवजी महाराजांनी त्यांची धान्याची कोठारे केली आहेत.
छत्रपती शिवाजीमहाराज जसे होते, तसे दाखवण्यापेक्षा ते जसे नव्हते तसे दाखवले जात आहे. कोणताही हिंदु राजा धर्मसहिष्णु असतो, त्याप्रमाणे महाराजही होते. पण याचा अर्थ हिंदु अस्मितेशी तडजोड करणे ही महाराजांची सहिष्णुता नव्हती. "धटासि व्हावे धटl उध्दटासि उध्दट ll" हा त्यांचा बाणा होता. "सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार" हे त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे व्रत होते. स्वराज्यासाठी बलिदान दिले असा एकही मुस्लीम सरदार समकालीन कागदपत्रात सापडत नाही.
संदर्भ – १. New Account of East india and persia-nine year travels
२. शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री.गजानन भास्कर मेहंदळे यांच्या भाषणातुन
अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ अवश्य पहा-
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m.youtube.com/watch%3Fv%3D5CDMcBZNNd4&ved=2ahUKEwjLgdPV6NXpAhWE7XMBHVD7BYwQo7QBMAB6BAgDEAE&usg=AOvVaw2lL4x93xA1V9oO8-vWGfPv
सर्जी हे सगळ सत्य आहे पण हे आपल्याला नवीन पीडी ला शाळेत, महाविद्यालयमध्ये हेच इतिहास मध्ये शिकवणे गरजेचे आहे त्या साठी काही तरी आपल्या करावे लागेल कारण ग्रामीण भागात हा इतिहास कमी प्रमाणात शिकवले जातात त्याचे कारण ग्रामीण भागातील तरुण हा राजकारण आणि जाती पतीत जास्त अडकलेले आहे
राहुल रामविलास दरक राजूर गणपती
26 Sep 2025 20:27
छान माहिती
फेक Narrative वाले
थयथयाट करतील
संगमेश्वर बालासाहेब नळगिरे
20 Mar 2025 21:39
परवाच एक व्हिडिओ पाहिला,त्यात एक शाळकरी मुलीच्या भाषणामध्ये शिवरायांनी रायगडावर मुस्लिम सैनिकांसाठी मशीद बांधून दिली आणि इतर गोष्टींचा ऊहापोह केला त्यात हिंदू मुस्लिम कसे एक आहेत हे सांगण्याचा कसोशीने भावनिक प्रयत्न केला आहे.परंतु आपण केलेल्या खुलास्यामुळे सर्व स्पष्ट झाले.धन्यवाद.
शिवानंद स्वामी
23 Feb 2025 13:11
अगदी खरी माहिती असू शकते आणि ते पण पुराव्यासकट दिली आहे, परंतु sir मला एक प्रश्न पडला आहे, तो असा की महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती आणि मग आता का बरे हिंदवी स्वराज्य असे उच्चारले जाते हे देखील स्पष्ट करा... ही माझी शंखा आहे
Krishna Kele
19 Feb 2025 13:27
सत्यमेव जयते.
परम सत्य.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
हिंदू राष्ट्र.
B.B.Nagare
22 Jan 2025 01:57
अत्यंत चांगली व सत्त्य सांगणारी माहिती आपण दिली, त्याबद्दल धन्यवाद.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम जास्त होते सांगणारे. मुस्लिमांची चाटूगीरी करणारे सेक्युलर जमातीचे हिंदू आहेत.
डाॅ किशोर मोहरीर
04 Oct 2024 09:58
ATI Uttam
Shalikram tejrao Shinde
10 Sep 2024 13:20
खर तर ही माहिती अधिक प्रमाणात सामान्य लोकांपर्यंत पोहचवणे हे सर्व शिव प्रेमी हिंदूंचे काम आहे. उगाचच व्हॉट्स ॲप वर खोटी , दिशाभूल करणारी माहिती पाठवली जाते.व लोकही त्याला विरोध करत नाही. खरी माहिती शालेय पुस्टकात समाविष्ट केली पाहिजे.
विनायक येवले
13 Jul 2024 20:37
फार महत्वाची सत्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर????
महेश भागवतराव भारंबे
12 Jun 2024 19:18
अत्यंत सत्यनिष्ठ व वास्तविक् समुपदेशन करण्यास उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. समाजात चुकीची माहिती पसरविणाऱ्या समाजकंटकांना या माहितीचा संदर्भ देण्यास उपयुक्त ठरेलं. सोबतच समाजाचे खरे प्रबोधन करता येईल.
प्रा. डॉ. देवेंद्र अनंतरामजी म
01 Jun 2024 16:05
खूप छान माहिती दिली सर अशी खरी माहिती जगा समोर आलीच पाहिजे
संजय सपकाळे
06 Mar 2024 10:57
आशी खरी महिती ही जगासमोर अली पाहीजे खुप छान महिती दिली.
अमोल विक्रम शेलार
05 Mar 2024 07:59
सत्यता समोर आणणे काळाची गरज आहे.अत्यंत उपयुक्त ऐतिहासिक सत्य आहे.
घनश्याम चत्रु राठोड
04 Mar 2024 20:16
सत्य माहिती मिळाली
आनंद काशिनाथ सोनटक्के
04 Mar 2024 20:14
खूप छान माहिती आहे काही समाज कंटकाकडून चुकीची माहिती सांगितली जाते
डाॅ गणेश पाटील
04 Mar 2024 19:44
खुप छान माहिती दिली आहे व सत्य आहे
अर्जुन टेकुळे
04 Mar 2024 19:41
खूप छान माहिती , सत्य आहे. अशी खरी माहिती सर्वांना माहित असणे आवश्यक आहे.
सतीश छंदसागर पाठक
04 Mar 2024 17:53