शेंदुर्णी, ०६ सप्टेबर| जळगांव जिल्ह्यातील शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे काल दिनांक ५ सप्टेबर रोजी रात्री दहाच्या सुमारास किरकोळ वादावरून तरुणांच्या वादातून कोळीवाडा वस्तीवर मुस्लीम जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले असून दुचाकी वाहन व हिंदूंच्या घरांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. दोन्ही बाजूच्या ४६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नेमके काय झाले?
कोळीवाडा भागात एका शाळेच्या व्यायामशाळेत सायंकाळी हिंदू व मुस्लीम तरुणांमध्ये वाद झाला होता. त्याचे पर्यवसान मारहाण व दंगलीत झाले. या व्यायामशाळेत अनेक तरुण व्यायाम करण्यासठी येतात. त्या ठिकाणी व्यायामशाळेत हनुमानाची मोठी प्रतिमा आहे. त्यामुळे सर्वजण आपली पादत्राणे बाहेरच काढतात. त्या ठिकाणी आलेल्या शेख अबरार यालाही तरुणांनी चप्पल बाहेर काढण्यास तरुणांनी सांगितले पण त्याने न ऐकता मुद्दामहून हनुमानाच्या प्रतिमेजवळ गेला. त्यावरून तिथे वाद झाला. थोड्या वेळाने हा शेख अबरार मोह्ल्य्यातून पाच सहा तरुणांना लाकडी दांडके व दगड विटा हातात घेऊन आला व व्यायामशाळेती हिंदू तरुणांवर हल्ला केला. त्याचा प्रतिकार करण्यात पुन्हा दोन्ही गटात वाद झाला व दोन्ही बाजूचे काही जन जखमी झाले. मुस्लीम तरुण घटनास्थळावरून पळून गेले व मोहल्ल्यात आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगून लोकांना चिथावणी दिली. त्यामुळे स्थानिक मुस्लीम जमाव कोळी वाड्यावर चालून गेला व तेथील हिंदू घरांवर तुफान दगडफेक केली. घरांचे दरवाजे खिडक्याचे व दुचाकींचे नुकसान केले. कोळीवाड्यातील लोकांना घटनेची काहीही कल्पना नसताना अचानक झालेल्या दगडफेकीमुळे लहान बालके व महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
हिंदू तरुणांवर खोटे गुन्हे दाखल?
सदर घटनेत पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आरोपींवर ४६ जणांवर गुन्हे दाखल केले असून खरे आरोपी सोडून हिंदू तरुणांना गोवले जात असल्याचा आरोप स्थानिक हिंदू नागरिकांनी केला आहे. ज्ञात २५ आरोपीपैकी ११ मुस्लीम असून १४ हिंदू आहेत. कोळीवाडा वस्तीवर दगडफेक करणारे जवळपास दीडशे ते दोनशे मुस्लिमांचा जमाव होता. परंतु पोलिसांनी केवळ ११ मुस्लीम आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे घटनेतील खऱ्या आरोपींवर कारवाई व्हावी व आमचे निर्दोष मुलांना सोडण्यात यावे यासाठी दोनशे ते अडीचशे हिंदू महिलांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले.
पोलिसांनी ज्या हिंदू व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत त्यापैकी काहीजण घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी उपस्थितच नव्हते तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. काही हिंदुनी केवळ स्वतःचा बचाव केला तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने दगडफेक करणाऱ्या खऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक भिका इंदरकर यांनी दिली, तर पोलीस प्रशासनाने घटनेत सहभागी नसलेल्या हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घेऊन दगडफेक करणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका हिंदू संघटनांनी घेतली आहे.