छत्रपती संभाजीनगर, 14.03.2025
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील सराई भागात मुस्लिम समुदायाकडून विरोध झाल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पोलिस प्रशासनाने होळी करण्यास नागरिकांना मज्जाव केला. होळी करायची असल्यास कलेक्टर साहेबांची परवानगी घ्यावी लागेल अशी अजब सूचनाही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली. रमजान महिना चालू असल्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून होळी करू नका अशी भूमिका पोलिसांनी घेतली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक महिलांनी अनेक विनंती करूनही पोलिस प्रशासनाने त्यांचे काही एक ऐकून घेतले नाही. त्यामुळे आता आमचे सण साजरी करायला आम्ही परवानगी घ्यायची का असा सवाल हिंदू समाजातून विचारला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फर्दापूर येथील सराई भागात मागील पन्नास वर्षाहून अधिक काळापासून होळी सण साजरी केला जातो. या भागात संमिश्र प्रमाणात हिंदू मुस्लिम वस्ती आहे. पण गेल्या एक दोन वर्षापासून मुस्लिम समुदायाकडून हिंदूंच्या सणामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहे. दिवाळीला सुद्धा आम्हाला फटाके फोडू दिले जात नाही. मागील वर्षीपासून होळीला विरोध होत आहे. पोलिस प्रशासनाने मागील वर्षीदेखील रमजान महिन्याचे कारण देत होळी करू दिली नव्हती. याही वर्षी त्यांनी करू दिली नाही. स्थानिक तरुण पोलिस प्रशासनाकडे होळी साजरी करण्याचा विनंती अर्ज घेऊन गेले होते परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे फर्दापूर येथील सराई भागात सलग दुसऱ्या वर्षी होळी पेटली नाही.
स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता माहिती मिळाली की मागील दोन तीन वर्षापासून शिव जयंती, श्रीराम नवमी, दिवाळी अशा उत्सवात मुस्लिम समुदायाकडून विरोध झाला आहे. छावा चित्रपटाचे लागलेल्या बॅनर वरील छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो फाडण्यात आला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दरम्यान लावलेल्या फलकावर काळे फासण्यात आले होते. जाणीवपूर्वक आमच्या सणांना विरोध होत असून पोलिस प्रशासनही त्यांचीच बाजू घेते असा आरोप स्थानिकांनी केला. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
एक ते दोन वर्ष उत्सव साजरे करुं देत नाहीये तर शासन वरच्या लेव्हल ला ह्या विषयामध्ये म्हणजे लक्ष देत नाहीये . आज सन उत्सव साजरे करुं देत नाहीये उद्या लग्नामध्ये वाजणार बँड पथक पणं बंद करतील ह्या विषयामध्ये शासनाने दुर्लक्ष न करता ठोस निर्णय घेतला पाहिजे.
मुकेश सोनवणे
14 Mar 2025 22:28
एक ते दोन वर्ष उत्सव साजरे करुं देत नाहीये तर शासन वरच्या लेव्हल ला ह्या विषयामध्ये म्हणजे लक्ष देत नाहीये . आज सन उत्सव साजरे करुं देत नाहीये उद्या लग्नामध्ये वाजणार बँड पथक पणं बंद करतील ह्या विषयामध्ये शासनाने दुर्लक्ष न करता ठोस निर्णय घेतला पाहिजे.
मुकेश सोनवणे
14 Mar 2025 22:28