नांदेड| जिल्ह्यातील हदगाव येथे 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुस्लिम समाजाने संदल मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत जातीय तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणी डीजे वर वाजवली जात होती. मिरवणूक गावातील महादेव मंदिर संस्थान समोर येताच जमाव प्रक्षोभक झाला. त्यावेळी पोलिसांनी डिजे बंद करायला लावला. डीजे बंद केल्यावर मुस्लिम जमावाने प्रक्षोभक घोषणाबाजी सुरू केली आणि मंदिराच्या दिशेने अश्लील हातवारे केले. त्याचवेळी त्यांनी मंदिरावर चपला मारून फेकल्या. महादेव मंदिर संस्थान, गणपती मंदिरावर दगडफेक सुद्धा केली. मंदिराकडून येत असताना श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या गाडीवर दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. रात्री हिंदू समाजाकडून पोलीस स्टेशन वर मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी 34 जिहादी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकाने दिली.
हिंदू महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न
जमावाने महादेव मंदिर संस्थानचा सीसीटिव्ही कॅमेरे फिरवून मंदिरावर दगडफेक व अश्लील हातवारे केले. त्याचवेळी जवळ असलेल्या अशोक कुटे यांच्या घराच्या पत्रावरून आत उडी मारत एका मुस्लिम जिहाद्याने घरात एकट्या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज तिथून बाहेर पडत असताना जिहाद्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. अशी माहिती ष.ब 108 सद्गुरू श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी व्हिडिओ द्वारे दिली आहे.
"हिंदू सहिष्णू आहे, पण भ्याड हल्ले सहन करणार नाही." - खा. डॉ. अजीत गोपछडे
समाज विघातक शक्तींनी हदगाव येथील मठ-मंदिरावर केलेले हल्ले म्हणजे निवडणूक आचार संहिता व ऐन हिंदू सणोत्सव तोंडावर आले असताना समाजास ठरवून चिथावन्याचा प्रकार आहे; या प्रकरणी संबंधित आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. असे खा. डाॅ. अजीत गोपछडे यांनी महादेव मठात झालेल्या हिंदू वीरशैव लिंगायत समाज बैठकीत सांगीतले. हदगाव शहरातील सामाजिक, वैद्यकीय, व्यापार, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व शेकडो युवक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठकीचा समारोप झाला.
Shame ???? shame ????
Sunil Mallikarjunappa Dahake
18 Oct 2024 21:02