रावणाचे उदात्तीकरण करणारे बऱ्याचदा म्हणतात की रावणाने सीतेला स्पर्श सुद्धा केला नाही. तो स्त्री चा सन्मान करणारा होता. त्याने सितेवर अन्याय केला नाही. जर हीच सत्यता असती तर रावण सीतेला लंकेत कसा घेऊन गेला? रावणाने सीतेला लंकेत घेऊन जाताना तिला खांद्यावर उचलले होते. वाल्मिकी रामायणात असे स्पष्ट वर्णन आहे.
अरण्यकांड ४९ वा अध्याय मध्ये रावण सीतेला कसा घेऊन गेला त्याचे वर्णन करतो.
“वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः।
ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥१७॥”
अर्थ: त्याने डाव्या हाताने कमलनयनी सीतेच्या केसासहित तिचे मस्तक पकडले आणि उजवा हात तिच्या दोन्ही मांड्यांच्या पाठीमागून घेऊन तिला उचलले.
सीता हनुमान संवादात सुद्धा सीता हनुमानाला सांगते, की मी इथून कोणत्याही परपुरुषासोबत जाऊ इच्छित नाही, कोणाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. रावणाच्या शरीराशी जो माझा स्पर्श झाला तो त्याच्या बलामुळे झाला. त्याने मला इथे आणले तेव्हा मी असमर्थ व अबला होती.
रावण हा स्त्रीलंपटच होता हे तो स्वतः मान्य करतो. स्त्रीकडे केवळ भोगविलासाची वस्तू म्हणूनच तो बघत असे.
सीतेच्या अपहरणावेळी तो तिला म्हणतो की मी आजपर्यंत अनेक स्त्रियांचे अपहरण केले आहे. (अरण्यकांड - अध्याय ४७)
“बह्वीनामुत्तमस्त्रीणामाहृतानामितस्ततः।
सर्वासामेव भद्रं ते ममाग्रमहिषी भव ॥२८॥”
अर्थ: मी इकडून- तिकडून बऱ्याच सुंदर स्त्रियांना हरण करून आणलेले आहे. त्या सर्वांमध्ये तू माझी पट्टराणी बन. तुझे भले होवो. रावण किती नीच होता हे यावरून स्पष्ट होते.
मग रावणाने सीतेला स्पर्श का केला नाही?
रावणाने सीतेला स्पर्श का केला नाही किंवा तिच्यावर बळजबरी का केली नाही, याचे उत्तर तो स्वतःच युद्धकांड मधील तेराव्या अध्यायात सांगतो.
तो म्हणतो की मी एके दिवशी मी पुंजिकस्थला नामक अपसरेला पाहिले. ती माझ्या भयाने लपतछपत जात होती. माझी नजर तिच्यावर पडताच मी तिला पकडुन तिचे कपडे उतरवले आणि तिचा उपभोग घेतला. ब्रह्म देवांना ही बातमी कळताच त्यांनी मला शाप दिला की तू एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध उपभोग घेतला तर तुझ्या डोक्याचे शंभर तुकडे होतील आणि तू मरशील. म्हणून मी सीतेला बळजबरी करत नाही असे रावणानेच सांगितले आहे.
रावण खूप सज्जन आणि नारी सन्मान करणारा होता म्हणून त्याने सीतेला हात लावला नाही असे म्हणणे साफ खोटे आहे.
वेदवतीचा शाप:
रावणाला कुशध्वज ह्या ब्रम्हर्षीची मुलगी वेदवती कडूनही शाप मिळाला होता. ती विष्णू पती मिळावा म्हणून तपश्चर्या करताना रावणाने पाहिले व तिच्यावर बलात्कार करण्याचा हेतूने तिला पकडले. रावण तिचे केस धरून फरपटत नेत असताना वेदवतीचे केस उपटले गेले व ती हातातून निसटली. त्याचवेळी तिने शाप दिला की येथून पुढे जर कुठल्याही स्त्रीवर बलात्कार केला तर जळून भस्मसात होशील. त्याच्या समोर तिने योगबळाने अग्नी पेटवून स्वतःला जाळून घेतले होते.
अप्सरा रंभेवर अत्याचार आणि शाप:
रावणाने स्वर्गातील अप्सरा रंभा हिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. रंभा नलकुबेर म्हणजेच रावणाच्या पुतण्याची बायको होणार होती. स्वतःच्या सूनेवर त्याने अत्याचार केले. नल कुबरला ही बातमी कळताच त्यानेही रावणाला शाप दिला होता की एखाद्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरी केली तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होऊन तू मरण पावशील.
म्हणून सीतेला प्रदीर्घकाळ बंदीवासात ठेऊन देखील तिला रावण साधा स्पर्श करु शकला नाही. त्यामुळे सीतेला त्याने हातही लावला नाही. यात त्याचा सात्त्विकपणा नव्हे तर नाईलाज आपल्याला दिसतो. रावणाची पत्नी मंदोदरीने सुद्धा रावणाला त्याचे मरण हे पतिव्रता स्त्रीच्या तपामुळे झाल्याचे म्हंटले आहे.
त्यामुळे रावण सीतेला फक्त हत्या करण्याची धमकीच देऊ शकला. अनेक विनवण्या करुन देखील सीता बधत नाही हे बघितल्यावर शापग्रस्त रावणाने सीतामातेला एक वर्षाची मुदत देऊन सांगितलं की *एक वर्षाच्या आत तू स्वतःहून माझ्याशी रत झाली नाहीस, तर मी तुझी हत्या करेन.* सीतेने आपल्याशी स्वतःहून रत व्हावे म्हणून तिचे मन वळवण्यासाठी धमकी देताना माझे ऐकले नाहिस तर तुझे मांस न्याहारी म्हणून उद्या माझ्यासमोर असेल असा श्लोक स्पष्ट पणे आला आहे (वाल्मिकी रामायण, सुंदरकांड, सर्ग २२). अशी विशिष्ठ धमकी देण्याचे कारण म्हणजे रावण स्वत:ही नरमांसभक्षक होता हेही स्पष्ट होते. (हमास चे आतंकवादी जे कृत्य आज करत आहेत.)
जेव्हा हनुमान सीतेला भेटायला लंकेला गेला, तेव्हा त्याने रावणाला "तू माझ्याशी स्वतःहून रत झाली नाहीस तर तुझी आणखी दोन महिन्यांनी हत्या करेन" अशी धमकी सीतेला देताना ऐकलं होतं. यावरून रावण किती क्रूर, सैतान, स्त्रीलंपट, अमानवी होता हे दिसून येतं.
अशा गोष्टी सांगून कोणाचाही फायदा होत नाही.
Your friends don't need it and your enemies don't believe it.
ज्यांच्या मनात हा विषय आहे ते सखोल अभ्यास करतील, सर्वसामान्यांना याविषयी सांगणे गरजेचे नाही
Gopal
26 Sep 2025 09:03
धन्यवाद कल्पेश,
तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.
Ayush
11 Oct 2024 21:32