
छत्रपती संभाजीनगर: दिनांक 5 ऑगष्ट 2026 रोज बुधवार सायंकाळी 6:30 वाजता नारेगाव येथे भटके विमुक्त विकास परिषद च्या वतीने मा. दुर्गादास जी व्यास अखिल भारतीय घुमंतू कार्य प्रमुख यांच्या हस्ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांना, शालेय साहित्य, दप्तर वह्या, कंपास, वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा, राहुलजी चौहान उपस्थित होते. तसेच ऍड. संतोष जी केंद्रे प्रांत युवा प्रमुख,विजय पवार प्रांत धर्मास्था प्रमुख व विभाग संयोजक. सर्जेराव वाघ जिल्हा अशासकीय सदस्य छत्रपती संभाजीनगर श्री राजेंद्रजी मेहता, प्रा अशोक जी बंडगर, कोचिंग क्लास चे संचालक श्री कानडे सर, बालाजी ढवळे, वंदनाताई कसारे महानगर महिला प्रमुख उपस्थित होते. मा दुर्गादास जी ने सर्वाना मार्गदर्शन केले विदयार्थी, विद्यार्थीनी, पालक, माता भगिनीं उपस्थित होते.
