विश्व संवाद केंद्र, संपादक मंडळ
22 days ago

- छ्त्रपती शिवरायांनी स्वराज्याचे अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली व त्यांचे पदनाम पूर्वी अरबी भाषेत होते ते संस्कृत मधून केले.
- संस्कृत भाषा व देवनागरी लिपीतून स्वतःची राजमुद्रा तयार करवून घेतली, त्याचसोबत आपल्या मंत्र्यांचीही संस्कृत भाषेतूनच मुद्रा बनवून घेतली.
- फारसी भाषेत चालणारा पत्रव्यवहार बंद करून संस्कृत प्रचुर मराठी भाषेतून पत्र व्यवहार सुरू केला. ज्याची सुरुवात ‘स्वस्ति श्री राज्याभिषेक शके’ अशी होत होती.
- प्रशासकीय कामकाजाची भाषा फारसी किंवा अरबी होती, ती बदलून संस्कृत व मराठी करण्यात आली. त्यासाठी स्वराज्याचा राज्य व्यवहार कोश तयार करवून घेतला व तब्बल चौदाशे परकीय शब्द काढण्यात आले. या कामासाठी रघुनाथपंत हणमंते व धुंडिराज व्यास यांची नेमणूक केली होती.
- इस्लामी आक्रमकांनी अनेक मंदिर मठांचे नुकसान केले होते, त्यामुळे महाराजांनी मंदिरांना दाने देण्यास सुरुवात केली. हिंदू मंदिरांच्या पुनर्निर्माण करण्यास प्राधान्य दिले.
- गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिर पोर्तुगीजांनी पाडून तिथे चर्च उभे केले होते, महाराजांनी तिथे चर्च पाडून पुन्हा दिमाखदार सप्तकोटेश्र्वराचे मंदिर निर्माण केले.
- तिरुवंनामलाई व समुद्रतिरपेरुमल येथे इस्लामिक आक्रमकांनी नायक राजांनी बांधलेले शिव व विष्णूचे मंदिर पाडून मशिदी उभ्या केल्या होत्या. महाराजांनी त्या मशीद पाडून त्याजागी पुन्हा हिंदू मंदिर उभे करून मंदिर जीर्णोद्धार केला.
- ज्याचा आरमार त्याचा समुद्र या उक्तीप्रमाणे महाराजांनी स्वराज्याचे आरमार उभे केले आणि पद्मदुर्ग उभा केला. त्यामुळे छ्त्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचे आद्य जनक मानले जाते.
- शिवराज्यभिषेक झाल्यापासून स्वराज्याची नवीन कालगणना सुरू करण्यात आली. त्यास ‘शिवराज्याभिषेक शक’ म्हणून संबोधण्यात आले. त्याचबरोबर कृष्ण ज्योतिषाकडून पंचांग शुद्धी करवून घेतली.
छ्त्रपती शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे हिंदू राज्याची पुनर्स्थापनाच होती. महाराजांच्या प्रत्येक धोरणातून त्यांचे हिंदू राज्याचे धोरण स्पष्ट होते.
=================
- विश्व संवाद केंद्र, संपादक मंडळ
Share With Friends
अभिप्राय
धर्म संस्थापक यांचे कार्य तुम्ही पुस्तक रुपात आहेच, पण ते डिजिटल युगात. डिजिटल करून जास्त समजा पर्यंत पोहोचवत आहात,,,,आपल्या कार्यास साष्टांग दंडवत
अश्विन ढगे
20 Jun 2024 08:18
अभिप्राय लिहा