भोकरदन: जालना जिल्ह्यातील आन्वा (तालुका भोकरदन) येथील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिरात मांसाचे तुकडे आढळून आल्याचा संतापजनक प्रकार १९ सप्टेंबर रोजी समोर आला होता. त्यानंतर हिंदू समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली व पोलिसांना सकल हिंदू समाजाकडून निवेदन देण्यात आले. हिंदू मंदिराची पावित्र्य भ्रष्ट करून हिंदूंची भावना दुखवणाऱ्या आरोपीला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका हिंदुनी घेतली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हाही दाखल झाला. परंतु दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रकारामुळे हिंदू समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पोलिसांनी केले. या घटनेतील संशयित आरोपी म्हणून गावातील नंदकिशोर वडगावकर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या दिवशी पहाटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो दिसला म्हणून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु यामागील सत्यता ही आहे की त्या व्यक्तीला पोलिसांनीच तिथे पाठवले होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मी माझा मोबाईल रात्री तिथे विसरलो तू तिथे जाऊन शोध असे त्याला पोलिसांनीच सांगितले. त्यानुसार तो व्यक्ती मोबाईल शोधण्यास गेला होता. सुरुवातीला त्याला सापडला नाही, परंतु दुसऱ्यांदा पुन्हा शोधल्यावर त्याला मोबाईल सापडला आणि त्याने चार लोकांच्या समक्ष तो फोन पोलिसांच्या ताब्यात दिला. तरीही पोलिसांनी त्याच्यावर संशयित आरोपी म्हणून बेकायदेशीर अटक केली आणि त्याला आता कोणालाही भेटू दिले जात नाही. वडगावकर यांच्या पत्नीने एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे पती निर्दोष असून त्यांना अडकवले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांची पोलिसांनी सुटका करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे पोलिसांनी बनाव करून त्या व्यक्तीला अडकवले का? पोलिस खऱ्या आरोपीला वाचवू पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे हिंदू समाजात अधिकच संताप व्यक्त होत आहे. खऱ्या आरोपींना अभय देऊन निर्दोष हिंदूला अटक कोणाच्या सांगण्यावरून केली जात आहे? अशी चर्चाही होत आहे. या घटनेच्या विरोधात भोकरदन येथे सकल हिंदू समाज आक्रोश मोर्चा काढणार असून त्यासाठी ह. भ. प. महंत रामगिरीजी महाराज (सरला बेट) व हभप संग्राम बापू भंडारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
***