१९२५ ला स्थापना झालेल्या RSS ला आता जवळपास शंभर वर्षे होत आली आहेत.हा संघ जगाच्या दृष्टीनं एक गूढ आहे.त्यात नेमकं काय चालतं हे समजत नाही.हा संघ सुरुवातीला दुर्लक्षित होता.पुढं ज्याच्या नशिबी केवळ हेटाळणी आली.त्याची टिंगलटवाळी झाली. त्या पुढं प्रचंड विरोध झाला.संघ अनेक आव्हानं झेलून आणि प्रतिकार पचवून देशाच्या सांस्कृतिक पटलावर केंद्रस्थानी पोहचला. संघात सामील होणाऱ्या स्वयंसेवकांची वाढणारी संख्या,लाखोंच्या संख्येत असलेली सेवा प्रकल्प,दवाखाने, शाळा, महाविद्यालय,बँका! अशा या संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आणि भविष्याचा वेध घेणारे हे पुस्तक वाचकाला संघ समजून घेण्यासाठी आणि संघाचे लक्ष्य जाणून घेण्यासाठी निश्चितच मदत करेन!
आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रदीर्घ वाटचालीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. संघ नेहमीच सातत्याने चर्चेत असतो. संघाच्या कामाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याचे कारण म्हणजे एकीकडे अनेक स्वयंसेवक वेगवेगळ्या राज्य सरकारात आणि केंद्र सरकार मध्ये उच्च पदांवर पोहोचली आहेत. त्याचवेळी संघाचे मूळ असणारे हिंदू राष्ट्र आणि एकात्मता यासंबंधीचे विचार आता आपल्या सामाजिक आणि राजनैतिक क्षेत्राची प्रमुख विचारधारा बनले आहेत.
संघाचा भारताच्या बाबतीतील दृष्टिकोन काय आहे? जर भारत हे एक हिंदू राष्ट्र बनले तर त्यामध्ये मुसलमान आणि इतर धर्मियांचे स्थान काय असेल?इतिहास लेखनाचा संघाचा प्रकल्प किती मोठा आहे? हिंदुत्व जातीचे राजकारण संपवू शकेल का? बदलती कुटुंब व्यवस्था आणि समाजातील विविध प्रकारच्या लोकांचे अधिकार याबद्दल संघाचा दृष्टिकोन काय आहे? या प्रश्नांची उत्तरं वाचकांना यात सुनीलजी प्रदीर्घ अनुभवाच्या आणि वास्तवाच्या आधारे देत आहेत.संघाची कार्यपद्धती आणि संघ समजून घेताना हे पुस्तक वाचकांना निश्चितच मदत करेल यात शंका नाही.पण संघ खरचं असा पुस्तकातून समजेल का?
संघाचं अधिकृत असे नोंदणीकृत कोणतेही सदस्यत्व नसते.कार्यकर्ता कार्यरत असताना एखादे काम करतो,त्याला तो स्वतःची जबाबदारी मानतो.दायित्व म्हणून कार्य करतो.पद म्हणत नाही.अनेक वर्षे काम करून ही संघ तो समजून घेत असतो.संघ समजून घेण्याची ही कार्यकर्त्यांसाठी प्रक्रिया अविरत चालू असते. स्वतः पू.गोळवलकर गुरुजींनी एका ठिकाणी म्हटलं आहे,"गेली जवळपास वीस वर्षे मी सरसंघचालक म्हणून जबाबदारी निभावतो आहे, तेव्हा कुठे मी आता म्हणू शकतो की मला संघ थोडा थोडा समजू लागला आहे." संघाचे स्वयंसेवक आणि इतर अनेक सज्जन संघ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. स्वयंसेवक कितीही वर्ष कार्यरत राहिला तरी "मला संघ संपूर्ण समजला आहे असे म्हणण्याची हिंमत करत नाही." कारण संघ हे मूर्त स्वरूप नाही.
देशाला परम वैभवाला घेऊन जाण्याची प्रार्थना आणि तशीच प्रतिज्ञा करणाऱ्या स्वयंसेवकांच्या मनात देशाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे लक्ष्य असते.देशाला गतवैभव मिळवून देताना ज्या देशासमोरील समस्या आहेत, आव्हाने आहेत त्यांच्यावर संघ स्वयंसेवक उत्तर शोधताना दिसतात.त्यातून अनेक गतिविधि तयार होतात.उदाहरण पर्यावरण गतिविधि! संघ अशा कितीतरी समस्येवर कार्यरत असतो.त्याच्याकडे व्यवस्था आहे...यामुळे समाजाची संघाकडून अपेक्षा वाढत जात आहे.असे अनेक महान व्यक्ती संघाला विविध विषयात लक्ष्य घालण्याची विनंती करतात.नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी लिहितात,"भारतभर पसरलेली एक उत्साही संस्था म्हणून आरएसएसने आपल्या शाखांमार्फत आपल्या देशातील सर्वात उपेक्षित आणि असुरक्षित मुलांचे संरक्षण करण्यासाठी फायर वॉल म्हणून काम करावे अशी माझी इच्छा आहे."
समाजात संघ संदर्भात जसे अनुकूल मत आहेत, तसेच टोकाचे प्रतिकूल मत देखील आहेत. पण आपले मत हे ऐकीव माहितीवर असेल तर? म्हणून आनंदकुमार सुपर थर्टी चे संस्थापक या पुस्तकाविषयी लिहितात,"आपण आयुष्यातील कोणत्याही बाबतीत सर्व काही जाणून घेतल्याशिवाय मत बनू नये. हे संघाच्या बाबतीतही खरे आहे, जो आज राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात सर्वात जास्त चर्चेचा विषय बनलेला आहे. संघात स्वारस्य असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे तयार समीकरणच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या उज्वल भविष्य च्या दिशेने हे पुस्तक अशा लेखकाच्या नजरेतून संघ टिपतो जो लहानपणापासून स्वयंसेवक म्हणून संघाशी जोडला गेलेला आहे. या पुस्तकात संघाच्या भविष्यातील योजना बद्दलही सांगितलेले आहे."
श्री मोहनदास पै लिहितात,"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच्या स्थापनेपासूनच भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनात महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. त्याची देशभक्ती आणि राष्ट्रीय वृत्ती या गोष्टी भारतीयांना आकर्षित करून घेतात. एक मोठी संस्था असूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक घट्ट वीणीचा आणि बाहेरच्यांसाठी अर्ध पारदर्शक आहे. आर एस एस आणि त्याची अंतर्गत कार्यप्रणाली यावर लिहिलेल्या या पुस्तकामुळे सुनीलजी आंबेकर यांनी संघाच्या जगाची खिडकी किलकिली केली आहे. हे पुस्तक संघाचा भूतकाळ, त्याचे भविष्य आणि भारतीय समाजातील त्याची भूमिका यामध्ये पूल बांधण्याचे काम करते." संघाची भूमिका आणि संघाचे तत्वज्ञान दोन्ही गोष्टी या पुस्तकातून वाचकांना समजतात हे निश्चित!