महाराष्ट्रातील काही नतद्रष्ट लोक औरंगजेबाचा बचाव करण्यासाठी छत्रपति शंभुराजांची हत्या मनुस्मृतीनुसार आणि ब्राह्मणांच्या सल्ल्याने केली अशी मांडणी करतात. या लोकांना खरा औरंगजेब समजलाच नाही. (किंवा समजून घ्यायचा नाही) औरंगजेबाने तख्तावर आल्यानंतर सर्व गैरइस्लामिक प्रथांचे उच्चाटन केले, एवढेच नव्हे तर मुस्लिमांची दाढी किती लांब असावी, याचेही त्याने नियम केले होते.
मुघलांच्या नाण्यांवर कुराणातील शब्द असत, ती नाणी हिंदुच्या हाती जाऊन अपवित्र होतात, म्हणून त्याने नाण्यांवर कुराणातील शब्द छापायला बंदी घातली. आपल्या राज्यातील मुस्लिमांचे वर्तन कुराणनुसार होत आहे ना? हे पाहण्यासाठी औरंगजेबाने "मुहतसीब" नावाचे आधिकारी नेमले. पालमाऊच्या मोहिमेत पत्र लिहून औरंगजेबाने "पालमाऊचा राजा मुसलमान होत नसल्यास त्याला ठार करावे " असा आदेश दिला . असा कट्टर औरंगजेब "ब्राह्मणांचे ऐकून मनुस्मृतीनुसार छत्रपति शंभुराजांच्या हत्येचे आदेश देतो" असे म्हणणे अज्ञानीपणाचे लक्षण आहे.
मराठे आणि मुघलांचा संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता, अशीही मांडणी मुस्लिमधार्जिण्या संघटना करत असतात. त्यांनी स्वत: औरंगजेब या संघर्षाबाबत काय म्हणतो, याचा अस्सल पुरावा वाचला पाहिजे. औरंगजेबाच्या २५ वर्षांच्या दख्खन मोहिमेत वसंतगडाची लढाई चालू असताना त्याच्या अगदी जवळचा अधिकारी साकी मुस्तैद खान याने औरंगजेबाचे स्वतःचे काही शब्द त्याच्या अधिकृत इतिहासात, म्हणजे मआसिर-ए-आलमगीरी या ग्रंथात, लिहून ठेवले आहेत.
"हे कळल्यावर, किल्ल्यापासून एका कोसावरून वाहणार्या कृष्णा नदीच्या काठावर त्याचा तंबू उभारायचा आदेश बादशाहाने दिला व म्हणाला की, 'ह्या सगळ्यामागे माझा बाकी काही उद्देश नसून, धर्मयुद्ध (घझा) हेच एकमेव उद्दिष्ट आहे, ह्याने अल्लाह व प्रेषित प्रसन्न होवोत. उद्या सकाळी आक्रमण करण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन मी निघेन व नीच काफिरांची कत्तल करून माझे निशाण उंचावेन'".
मआसिर-ए-आलमगीरी, साकी मुस्तैद खान, पृष्ठ क्रमांक ४१०-४११.
आता ३२१ वर्षांपूर्वी औरंगजेबाने स्पष्ट शब्दात हिंदु मराठ्यांविरुध्दचा संघर्ष हा इस्लामिक जिहाद असल्याचे म्हटले आहे. गुढीपाडवा बंद करण्यासाठी समाजकंटकांनी बिनबुडाच्या भाकडकथा उभ्या केल्या. छत्रपति शंभुराजांच्या मृत्यूपूर्वी गुढीपाडवा साजरा होत असल्याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत.
छत्रपति शंभुराजांच्या हत्येनंतर मोगलाई यायला हवी मग पेशवाई कशी आली? असा खुळचट प्रश्न कधी कधी जमाते पुरोगामीवाले विचारतात. वास्तविक शंभुराजांच्या हत्येनंतर छत्रपति राजाराममहाराज, महाराणी ताराबाई ,संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी मोठा संघर्ष केला, मग मोगलाई कशी येईल? शंभुपुत्र छत्रपति शाहुमहाराजांनीही दीर्घकाळ राज्य केले. तेव्हा कोणती पेशवाई होती? मुळात पेशवे म्हणजे छत्रपतिंचे सेवकच होते. थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे , चिमाजी अप्पा यांना छत्रपतिंविषयी किती आदर होता, याचे उल्लेख समकालीन कागदपत्रात दिसून येतो.
गुढीपाडवा आला की मनुस्मृती बाजारात मांडायची , दसरा आला की रावण किती श्रेष्ठ होता हे सांगायच!! होळीला महिलेचे दहन म्हणायचे, असे हिंदुद्रोही उद्योग या मंडळींनी सुरु केले आहेत "हिंदुनीच आपल्या प्रथा -परंपरा स्वहस्ते बंद कराव्यात आणि हळूहळू जातीजातीत संघर्ष निर्माण होऊन राष्ट्रविघातक शक्तींचा फायदा व्हावा, हाच यांचा उद्देश्य असल्याची शंका येते. म्हणून समाजाने संघटीतपणे या विघातक शक्तींचे डाव हाणून पाडण्याची गरज आहे.
छत्रपती शंभुराजे हे आमचे राष्ट्रीय महापुरुष आहेत. प्रत्येक हिंदुने आपल्या घरातील भावी पिढीला शंभुचरित्र सांगितले पाहिजे. शंभुचरित्र म्हणजे हिंदुत्वासाठी केलेल्या संघर्षाचे धगधगते पर्व आहे. परकीयांचे पाय आपल्या मायभुमीला लागू नये, यासाठी केलेले महाभारत आहे. शंभुचरित्र म्हणजे रयतेचे कल्याण आणि सुशासनाचा आदर्श सांगणारे रामायण आहे.
नविन पिढी असले लेख वाचत नाही . . . मुळात लेखनाची व वाचनाची आवडच राहिली नाही . त्यामुळे कितीही पोटतिडकीने लिहिले तरी ते वाचले जाईलच असे नाही . त्यापेक्षा छोटपा छोट्या रिळ Serial नुसार बनविल्या तर त्याचा प्रभाव जास्त राहिल अलीकडे लहान मुलेही रिल बघत असतात
Milind
25 Mar 2025 15:26
अहो हे शब्द समजत नाहीत वाक्य कसे समजावे,भाषा व्यवस्थित येईल अशी लिहिली तर जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल
त्यासाठी आपल्याकडून शुद्ध आणि प्रभावी असे यायला हवे
Ramakant mantri
03 Mar 2025 08:12
लिंब्राडू जमातीचे हे काटकरस्थान आहे हिंदू धर्मात जातीजातीमध्ये तेढ निर्माण करावयाची
Shankar raut
17 Feb 2025 14:02
अगदी सत्य आणि झणझणीत अंजन घालणारा लेख
Ramakant Patil
17 Feb 2025 11:32