
अमळनेर| ‘भूमी स्वस्थ तर समाज स्वस्थ’ या संकल्पनेवर आधारित ‘भूमी सुपोषण व संरक्षण अभियान’ हे अभियान अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व्ही. भागैय्याजी उपस्थित राहणार आहे. शेती, मातीचे आरोग्य, नैसर्गिक शेती, तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत कृषीपद्धती या विषयांवर व्यापक संवाद होणार असून देशभरातून सुमारे ५ हजार कृषीप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
शेतकरी बांधवांमध्ये विषमुक्त शेतीचे महत्व तसेच सेंदीय शेतीची आवश्यकता या विषयी जागरण करण्यासाठी ग्रामविकास गतीविधी दरवर्षी वर्ष प्रतिपदेच्या दिवशी या अभियानास सुरुवात करते. यावर्षी अमळनेर येथून हि सुरुवात होत असून शेतकरी बांधवांना येतांना आपल्या शेतात्तील मुठभर माती घेऊन यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेता मातीचे पोषण, बियाण्यांपासून शेती पद्धतीपर्यंत नव्याने विचार करण्याची गरज तसेच, प्रशासन, सामाजिक संघटना आणि शेतकरी यांचा सक्रिय सहभाग या अभियानाला व्यापक चळवळीचे रूप देईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अमळनेरच्या मंगळग्रह मंदिर या कार्याक्रमचे आयोजन करत आहे.

