सरसंघचालक आणि मौलाना भेट; सत्यता काय?
रा. स्व. संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा मुस्लिम मौलानांचा सन्मान करतानाचा व्हिडिओ सध्या वायरल केला जात आहे. आणि लोकसभा निवडणुकीच्या परिणामांना घाबरून संघ आता मौलाना आणि मशिदीत जाऊ लागला असा अपप्रचार होत आहे. परंतु, सत्यता ही आहे की हा व्हिडिओ 8 जुलै 2023 चा आहे.
सरसंघचालक मशिदीत गेले होते का?
सरसंघचालक मौलनाना भेटले म्हणून काही जण प्रश्न सुद्धा उपस्थित करत आहे की सरसंघचालक मशिदीत का गेले? असे प्रश्न आपण खरंच विचारपूर्वक विचारतो का? सरसंघचालक सप्टेंबर 2022 मध्ये मौलाना इलियासि यांच्या विनंतीवरून मशिदीत गेले होते. त्यांनी तेथील मदर्श्यातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांना काही प्रश्न केले आणि संवाद साधला. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन चे प्रमुख असलेले मौलाना इलीयासी यांनी सरसंघचालकांनी खूपवेळा विनंती केली होती की आमच्या संस्थेला भेट द्यावी. त्या विनंतीवरून मोहनजी तिथे गेले होते.
त्यानंतर 8 जुलै 2023 रोजी मौलाना इलियसी यांच्या मुलाच्या विवाह निमित्त ठेवलेल्या रिसेप्शन कार्यक्रमात सरसंघचालक गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते काही मुस्लिम मान्यवरांना आणि मौलानांचा सरसंघचालकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मौलाना इलीयासि यांनी डॉ. मोहन भागवत यांना ‘राष्ट्रऋषी’ आणि ‘राष्ट्रपिता’ अशी उपमा दिली.
मौलाना ईलियासी यांच्या या कृत्यामुळे मुस्लिम कट्टरतावादी लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे त्यांनी मौलाना इलीयसी यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर इलीयासी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
हिंदूंनी चिंता करण्याचे कारण काय?
हिंदूंच्या सर्वात मोठ्या संघटनेचे सर्वोच व्यक्ती मशिदीत गेले म्हणून हिंदूंनी चिंता करायची की मुस्लिमांनी याचा विचार करा. ज्यांना चिंता वाटली त्यांनी इलीयासी यांना धमक्या दिल्या. या प्रसंगावरून संघ सेक्युलर किंवा मुस्लिम धार्जिणा होईल का काय? अशी चिंता करण्यापेक्षा मुस्लिम समाज राष्ट्रीय प्रवाहात येईल अशी शक्यता अधिक नाही का? त्यामुळे हिंदूंनी काळजी करण्याचे कारण काय?
याची प्रचिती नंतर आलीच आहे. इलीयासी यांचे वक्तव्य पाहा. त्यांच्या बोलण्यात राष्ट्र प्रथम, देशभक्ती, राम भक्ती असे शब्द आहेत. त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात अनेक मुस्लिम मौलानांना सोबत घेऊन दर्शन घेतले आहे. राम, कृष्ण, महाभारत हाच आपला इतिहास असल्याचं त्यांना मान्य आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात सद्भावना निर्माण करून भारताला विश्र्वगुरु केलं पाहिजे असे ते म्हणतात ते स्वागतार्ह आहे.
संघ मुस्लिमांना का भेटतो?
संघाचे कार्यकर्ते संकुचित विचारांनी काम करतच नाही. संघ जोडण्याचं काम करतो. जे आपले वैचारिक विरोधक आहेत संघ त्यांनाही भेटतो, त्यांच्याशी संवाद साधतो. यापूर्वी संघाने अनेक पक्ष, संघटनेच्या नेत्यांशी संवाद साधला आहे. भारतातील सर्व लोक हिंदू आहेत. काही जण मान्य करतात, काही करत नाही व काहींना करून घ्यायचे नाही. अश्या सर्वांना संघ भेटतो. त्यांना दूर न करता सत्याची जाणिव करून देण्यासाठी संघाचे प्रयत्न चालू असतात. त्याला यश येत आहे. संघ स्वयंसेवकास याची जाणीव आहे. बाकी समाजानेही समजून घेऊन संघ कार्यावर विश्वास ठेवला पाहिजे. संघ कार्य ईश्वरी कार्य आहे. कोणाच्या मनात आले आणि काहीतरी केले असे होत नाही.
https://www.aajtak.in/fact-check/story/fact-check-mohan-bhagwat-and-chief-imam-umer-ilyasi-meeting-took-place-before-lok-sabha-elections-ntc-2010526-2024-08-14