छत्रपती संभाजीनगर| 29.09.2025
मराठवाड्यात मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी वर्ग, भटके विमुक्त बांधव, मजूर वर्ग व पाड्यावर वस्तीवर राहणाऱ्या समाजाला या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचे घर, संसार, अन्न धान्य वाहून गेले. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व सेवा भारतीकडून अनेक ठिकाणी सेवाकार्य सुरू आहेत. आता अनेक संस्था सुद्धा सहभागी होत असून मागील आठवड्यात लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी संघ स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केले आहे.
परंडा येथे आरोग्य शिबिर
परंडा (जिल्हा धाराशिव) तालुक्यात अतिवृष्टी व महापूराने थैमान घातले आहे. यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे साथीचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक व सेवाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२८) ढगपिंपरी (ता. परंडा ) येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात १५० जणांची तपासणी करण्यात आली. लातूर येथील डॉक्टरांनी ही तपासणी केली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रांत कार्यकारिणी सदस्य सतीशराव कोळगे, जिल्हा सेवा प्रमुख बाळासाहेब देशमुख उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक शहाजी चौधरी, योगेश हिवरे, समीर कुलकर्णी, अक्षय हिवरे, पोलीस पाटील हरिदास हावळे यांनी पुढाकार घेतला.
Facebook link
https://www.facebook.com/share/p/1FycQnAzGG/
फूड पॅकेट्स व किराणा सामान किटचे वितरण
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना फूड पॅकेट्स व किराणा सामान किट वितरित केले. रुई वडनेर, देवगाव, लाखी बुकी, करंजा येथील काही छायाचित्र.
लातूर शहरातील भटके विमुक्त बांधवांसाठी मदतकार्य
लातुर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा भारती यांच्यातर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली. लातूर शहरातील काही भागांमध्ये कुष्ठधाम वस्ती, विजयनगर वस्ती, नाथजोगी वस्ती, मोहन नगर वस्ती घरामध्ये पाणी जाऊन अतिवृष्टीने खूप नुकसान झाले होते. त्यांना अन्न तयार करून खाणे सुद्धा शक्य नव्हते. अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. अशा चार ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली.
Facebook Link
https://www.facebook.com/share/v/1JcgucfTFC/
घरात अडकलेल्या नागरिकांना मदत
मराठवाड्यातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक मदतकार्य करत आहेत. आतापर्यंत मागील तीन चार दिवसात लातूर, परभणी, चाकुर, नांदेड या ठिकाणी स्वयंसेवकांनी फूड पॅकेट्स, बिस्कीट, पाणी, किराणा सामानाच्या किट गरजू बांधवांना पोहचवल्या आहेत.
बीड जिल्ह्यात भांडी वितरण
बीड जिल्ह्यातील धामणगाव, पानाची देवळाली, घाटा पिंपरी, देव देवळा, देविनिमगाव कडा येथे ज्या परिवाराच नुकसान पुरामुळे झाले त्यांना भांड्याचे किट सेवाभारती बीड जिल्हा यांच्या वतीने वाटप करण्यात आले.
Facebook link
https://www.facebook.com/share/p/14MCVmNYEZw/
विहा मांडवा येथे आरोग्य शिबिर
छत्रपती संभाजीनगर शहरातील नामवंत सामाजिक संस्था सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी आज पासून आरोग्य शिबिर सुरू झाले . पहिले शिबिर पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे घेण्यात आले. डॉ. संदीप डफळे यांनी बैठक घेऊन संस्थेच्या माध्यमातून सुरुवात केली. पुढील काही दिवस अनेक ठिकाणी असे आरोग्य शिबिर घेण्याची योजना या संस्थेने केली आहे.
Facebook link
https://www.facebook.com/share/p/19y5E6rTz3/
सुंदर काम अभिनंदनीय,वंदनीय, अनुकरणीय असा आदर्श ठेवला आहे : धन्य वाद
श्रीकांत खोत
30 Sep 2025 09:24